अहमदनगर नेवासा :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे कृषी महाविद्यालय भानसहिवरे ता. नेेेवासा येथील कृषीकन्या कु.मयुरी ज्ञानदेव नेव्हल हिने शेतकऱ्यांना माती परीक्षण का करावे याचे मार्गदर्शन केले.
जमिनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्न द्रव्याची कमतरता आहे हे तपासणे आणि ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे ठरवता यावे या करिता माती परीक्षण आवश्यक आहे. तसेच अधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनिची हानी होत आहे . माती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील मुख्य अन्नद्रव्य नत्र स्पृरत पालाश यांचे प्रमाण कळते. संबंधित कृषी कन्येला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.ए. दरंदले व कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.आर.माने व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभत असल्याची माहिती कृषिकन्येने दिली.