निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, 

अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार. 

माय सह्याद्री- अहमदनगर,पाथर्डी 

वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लादली. मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक प्रसिद्ध पत्रक काढले असुन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील केली आहे.केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी व शेतक-यांना भिकेला लावणारा असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटना पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनी व्यक्त करत केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयाचा शेतक-यांच्या वतीने जाहीर निषेध केला आहे . सविस्तर बोलताना मरकड म्हणाले की कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देण्याऐवजी अधिक अडचणीत आणण्याचे महापाप केले असून यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. रब्बी हंगामातील ( मार्च , एप्रिल महिन्यात ) काढलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी असल्याने कांदाचाळींमध्ये साठवून ठेवला होता.गेली पाच , सहा महिने हा कांदा साठवून ठेवलेला असल्याने यातील निम्माअधिक कांदा चाळीतच सडला असुन राहिलेल्या कांद्याच्या वजनात मोठी घट झालेली आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात केलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आल्याने तसेच कांद्याची निर्यात सुरू झाल्याने कांद्याची मागणी वाढुन सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होऊ लागली होती सहा , सात रूपये दराने विकला जाणारा कांदा तीस रूपयांपर्यंत गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु शेतकऱ्यांचा हा आनंद केंद्र सरकारने फार काळ टिकु दिला नसुन.कांद्याचे दर चढताहेत हे केंद्र सरकारच्या लक्षात येताच केंद्र सरकारने सोमवारी तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली यामुळे मुंबईच्या जेएनपीटी पोर्टवर ४०० कंटेनर , चेन्नईच्या पोर्टवर ८० कंटेनर तर बांगलादेशाच्या सीमेवर ३०० ट्रक कांदा अडकुन पडला आहे. कांदा निर्यातबंदी चा निर्णय झाल्याची बातमी येताच कांद्याचे दर प्रचंड कोसळले आहेत. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली पाच ते सहा महिने शेतमालाला कवडीकींमत भाव मिळत होता यादरम्यान शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले असून , केंद्र सरकार शेतकरी विरोधीच असल्याचे या निर्णयामुळे स्पष्ट होत आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन कांदा निर्यात सुरू करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या हितासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील. 


 माय सह्याद्री टीम मंगेश शेरकर, कासारपिंपळगाव, पाथर्डी

mysahyadrilive@gmail.com

थोडे नवीन जरा जुने