माय सह्याद्री रिपोर्ट- अहमदनगर शेवगाव: 

आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शेवगाव, येथे ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती’ साजरी करण्यात आली.  या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले व  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक प्रा. सुधीर खिल्लारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यक्रमाची  रूपरेषा सांगून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. छात्राध्यापिका सय्यद आशिया यांनी तयार केलेल्या PPT चे मा. प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले यांनी विमोचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.राजेंद्र बांगर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सामाजिक व शैक्षणिक विचार आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून मांडले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा उहापोह करत आपणही आपल्या जीवनात त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे असे सांगितले. तसेच विविध अनुभवलेल्या उदाहरणांच्या सहाय्याने समाजातील सद्यस्थिती मांडून छात्राध्यापाकांनी स्वावलंबी जीवन कसे जगावे? यासंबंधी अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या  शेवटी प्रा. राम नेव्हल यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. 

या कार्यक्रमप्रसंगी प्रा. भगवान बारस्कर, प्रा. प्रकाश गांगर्डे ,डॉ. भाऊसाहेब देवकाते, प्रा. स्मिता नाईक, प्रा. चेतन गर्जे, ग्रंथपाल श्री राजेंद्र काळे, व ललित कला शिक्षक श्री मनोज नरवडे, कार्यालयीन कर्मचारी श्रीमती शोभा शिंदे, श्री.अविनाश दारकुंडे, श्री. राम गाडेकर, श्री दीपक पवार, श्री रमेश खेडकर इ. व महाविद्यालयाचे द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक गुगल मीटवर ऑनलाईन उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने