भाविनिमगाव - जायकवाडी जलाशयाच्या पाण्यामुळे असंपादित जमिनीवरील पिकाचे पंचनामे करून भरपाई देण्याचे निवेदन शेतक-यांन समवेत देताना सभापती डॉ. क्षितिज घुले . ( छाया शंकर मरकड )
माय सह्याद्री - शंकर मरकड
जायकवाडी जलाशयाचे पाणी असंपादित जमिनीवरील शेतीपिकात शिरून हजारो हेक्टर क्षेत्राचे पिक सलग दुसऱ्यांदा पाण्यात गेले असून काठालगतचा शेतकरी हतबल झालेला आहे. मागील वर्षी पंचनामे होऊन ही नुकसान भरपाई रक्कम मिळाली नसुन आजही पंचनामे करण्यास सुरुवात झाली नाही. जायकवाडी जलाशयाच्या पाण्यामुळे हि शेतक-यांवर परीस्थिती ओढावली असल्याने शेतक-यांचे झालेले नुकसान हि शेतक-यांना भरपाई करून देण्याची जबाबदारीही जायकवाडी प्राधिकरणाचीच आहे. असे स्पष्ट मत जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेंद्र काळे यांच्याशी चर्चा करताना शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले पाटील यांनी व्यक्त केले.
पैठण येथील कार्यालयात अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांच्याशी नुकसान ग्रस्त शेतक-यांसमवेत सभापती डॉ .घुले यांनी भेट घेतली. यावेळी 2019 मध्ये नुकसान झालेल्या पिकांची रक्कम शेतकऱ्यांना आजपर्यंत न मिळाल्याबद्दल व चालू वर्षी ही जलाशयाचे पाणी असंपादित क्षेत्रात शिरल्यामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून मागील व आताची नुकसान भरपाई त्वरित मिळणे बाबत सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद .अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेंद्र काळे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. मागील वर्षी जायकवाडी जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांच्या असंपादित क्षेत्रात शिरल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
आपल्या कार्यालयाकडून सदर पिकांचे पंचनामे झाले आहेत.तसेच पीक परिगणना तक्ता आपल्या कार्यालयात देण्यात आला आहे परंतु आज एक वर्षाच्या कालावधी मध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही तेव्हा सदर प्रकरणी आपण तातडीची कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या खाती पिक नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी तसेच चालू वर्षी सन 2020 मध्येही जायकवाडी जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांच्या असंपादित क्षेत्रात शिरल्यामुळे शेवगाव तालुक्यातील क-हेटाकळी ते दहिगाव ने पर्यंतच्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कांदा, तूर, भुईमूग, ऊस,कपाशी,बाजरी आदि. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी आपल्या विभागामार्फत शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई मिळावी दोन्ही बाबीचा गांभीर्याने विचार करून त्याबाबत तातडीची कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर एरंडगाव पं .समीती सदस्य मंगेश थोरात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अॅड अनिल मडके, बोडखे सरपंच नानासाहेब वेताळ, एरंडगाव समसुद सरपंच संतोष धस, एरंडगाव भागवत सरपंच गोकुळ भागवत, खान पिंपरी सरपंच संतोष पावसे ,जायकवाडी समिती समन्वयक संतोष आडकीत्ते, गोविंद मुंगसे, मकरंद बारगुजे, भाऊराव माळवदे, संतोष शेटे, अशोक भागवत, मधुकर आवारे , कृष्णा व्यवहारे, भाऊसाहेब राजळे, आदींसह नुकसानग्रस्त शेतक-यांच्या स्वाक्षरी आहेत.
निवेदन प्रती ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे , जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर ,तहसीलदार शेवगाव यांना देण्यात आल्या आहेत.
जायकवाडी प्राधिकरण, नगर महसूल विभाग संयुक्त पंचनामे करणार
मागील वर्षी जायकवाडी जलाशयाच्या पाण्यामुळे असंपादित जमिनीवरील पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली आहे. ती ११४ शेतक-यांच्या खाती वर्ग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सध्या असंपादित जमिनीत शिरलेल्या पाण्यातील पिकाचे पंचनामे जायकवाडी प्राधिकरण व अहमदनगर महसूल विभाग( शेवगाव ) संयुक्त पंचनामे करणार असल्याने शेतक-यांनी काळजी करू नये.
राजेंद्र काळे - जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद अधीक्षक अभियंता व प्रशासक
घुले धरणग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी
जायकवाडी प्रकल्पाने विस्थापित झालेल्या शेवगाव तालुक्यातील शेतक-यांना हरेक प्रकारे मदत ही स्व. मारूतरावजी घुले पाटील यांच्या नंतर चिरंजीव डॉ. नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्या बरोबर तीस-या पिढीतील डॉ. क्षितिज नरेंद्र घुले यांच्या माध्यमातून कुठल्याही संकट समयी धरणग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी आहे. बॅक वॉटर, वीज, पाईपलाईन, ऊस कारखाना , जायकवाडी पुनर्वसन आणि आपत्कालीन परीस्थितीत तालुक्यातील धरणग्रस्त शेतक-यांनशेतक-यांचे घुले घराणे मोठा आधार आहे.
संतोष आडकीत्ते - धरणग्रस्त समिती समन्वयक, भाविनिमगाव.
औरंगाबाद / अहमदनगर जिल्हा हद्दी वरून वाद व चालढकल पणा भरडतोय शेतकरी
दोन वर्षे सलग जायकवाडी जलाशयाच्या पाण्यामुळे असंपादित जमिनीवरील पिकाचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी जायकवाडी प्राधिकरण औरंगाबाद व अहमदनगर महसूल विभाग यांच्या कुरघोडी मुळे ( कारण शेतक-यांचे नुकसान जायकवाडी प्राधिकरण मुळे तर नुकसान गस्त भाग अहमदनगर महसूल विभागाचा त्यामुळे भरपाई तुम्ही द्या असे दोन्ही बाजूंनी सांगितले जात असे.) शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी शेतक-यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला तेव्हा जायकवाडी प्राधिकरण व शेवगाव महसूल यांनी संयुक्त पंचायत केले मात्र वर्ष झाले नुकसान भरपाई नाही. तोच दुसऱ्यांदा शेतीपिकात पाणी शिरून दुबार नुकसान झाले आहे. आता नुकसान भरपाई डबल द्यावी लागणार आहे. आणि पंचनामे सुध्दा सरसकट होणे गरजेचे आहे.
माय सह्याद्री टीम- अशोक वाघ, शेवगाव.