काठालगतच्या वहीतीच्या  शेती व पिकांचे मोठे नुकसान ; पंचनामे, नुकसान भरपाईची मागणी.



माय सह्याद्री - शंकर मरकड
यंदा झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी जलाशयात शंभर टक्के पाणी साठवण केल्याने 102 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या या जलाशयात मुबलक  गाळाचे प्रमाण झाल्याने व यंदा पुर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्याने  जलाशयासाठी संपादित केलेल्या क्षेत्राबाहेर जलाशयाचे पाणी पसरले असल्याने जलाशयाच्या कडेच्या बिगर संपादित क्षेत्रात हे पाणी  आल्याने शेतकऱ्यांच्या खरीप  पिकावर पाणी फिरले असुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

या परीस्थितीला  जायकवाडी जल व्यवस्थापन  जबााबदार  असल्याचे शेेतकरी बोलत आहेत. कारण जलाशयातील गाळाचे व मागील वर्षी झालेल्या असंपादित क्षेत्रातील पिकाचे नुकसान  प्रमाण लक्षात घेता जल व्यवस्थापनाने या वर्षी कीमान ५ टक्के पाणी साठा कमी ठेवण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने  जायकवाडी जलाशयाच्या कडेचा शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने  ते कर्हेटाकळी तर जलाशयासाठी नेवासा, गंगापूर, या तालुक्यातील   परीसरात  सर्वत्र   धरणाच्या पाणीसाठ्याने धरण हद्द पार करून लगतच्या शेतीत सुमारे दोनशे ते पाचशे काही ठिकाणी  हजार  फुुटापेक्षा जास्त अंतरावर पाणी आले आहे.


या परीसरातील ऊस, कपाशी, बाजरी, तुर  शेतीत सर्वत्र   पाणी साठलेले असुन पिके सडली  आहे. जलाशयाच्या कडेच्या परीसरात अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढे येऊन मिळतात यांची संख्या मोठी असुन हे वाहते पाण्याचे स्रोत तर धरण हद्दी पासून तब्बल एक ते दोन किलोमीटर अंतरावर पाण्याचा तुंब आला असल्याने या ओढे नाल्यांच्या कडेच्या शेतजमीनी तर अतिशय पानथळ बनल्या असून या जमिनीतील शेती पिके काढणीला आली मात्र ती पाणी साठल्याने काढता येत नसुन  सडत आहेत.

जायकवाडी जलाशयात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्याने ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली असुन या नुकसानीला जबाबदार जायकवाडी जल व्यवस्थापन आहे. कारण धरणात गाळाचे प्रमाण वाढल्याने पाणीसाठा कमी होत आहे व व्यवस्थापनाने जलसाठा शंभर टक्के धरल्याने पाणी संपादित क्षेत्राबाहेर आल्याने  हजारो एकर शेतजमीन ( अधिग्रहित न झालेली ) आजच्या घडीला धरणात बुडाली आहे. त्यातील उभ्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. तर एकीकडे या जमीनी धरणग्रस्त क्षेत्र म्हणून संपादित करण्याचा मतप्रवाह पुढे येत आहे. कारण जलाशयातील गाळामुळे दरवर्षी ही परिस्थिती उद्भवते आहे.

सलग दुसऱ्यांदा नुकसान, भरपाई नाही.
माझी भाविनिमगाव हद्दीत शेतजमीन येत असून 84 आर अधिग्रहित न झालेले सर्व क्षेत्र आज धरणाच्या पाण्याखाली असून त्यातील ऊस, कपाशी, घास, बाजरी ही पिके पाण्याने सडली आहेत. मागील वर्षी ही जलाशय भरल्याने पिके पाण्यात गेली होती सलग दुसऱ्या वर्षी पिके पाण्यात मात्र मागील वर्षी पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही. यंदाही तीच परीस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करून  भरपाई त्वरित द्यावी. गोविंद गुलाबराव मुंगसे - शेतकरी भाविनिमगाव. ता, शेवगाव. जिल्हा अहमदनगर.

मागील वर्षी ची भरपाई नाही. कृषी विभागाच्या निष्काळजीपणा
मागील वर्षी प्रथमच असंपादित क्षेत्रात पाणी आले होते. पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी पंचनामे करण्यात प्रशासनाने स्थानिक की प्राधिकरण असा घोळ घालत पंचनामे उशिरा मात्र संयुक्तरीत्या केले. यात शेवगाव तालुका कृषी विभागाने एकरी पिक उत्पादन अत्यंत कमी दाखवल्याने अतिशय तुटपुंजी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आली ती तालुक्यातील शेतक-यांनी नाकारली ते प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले असून त्यावर निर्णय होण्या अगोदरच दुसऱ्यांदा प्रकल्पाचे पाणी पिकात शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी मात्र मागील वर्षी च्या नुकसान भरपाई तर यंदा पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आहेत. लोकप्रतिनिधी निवडणूक काळात जायकवाडी मुद्दा उपस्थित करतात मात्र आज जायकवाडी मुळे झालेल्या नुकसानी बद्दल मात्र सर्वच राजकीय नेते गप्प आहेत. याची चर्चा होत आहे.

माय सह्याद्री टीम 
शंकर मरकड , अशोक वाघ - शेवगाव 

थोडे नवीन जरा जुने