माय सह्याद्री रिपोर्ट - कोपरगाव: 

कोरोना संकटकाळात सरकारी तसेच खाजगी डॉक्टर पार पाडत असलेली भूमिका अतिशय महत्त्वाची असून कोपरगाव कोठारी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी सर्व अत्यावश्यक सुविधायुक्त हॉस्पिटल सुरू करणे हे अतिशय कौतुकास्पद आहे असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. 

डॉ. कोठारी हॉस्पिटल  २५ बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे  उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे श्री. दत्तगिरी महाराज, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, नितीनदादा कोल्हे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप कर्पे, जी. प. सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. मयूर जोर्वेकर, निमाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे, कोठारी हॉस्पिटलचे डॉ. रमेश कोठारी, डॉ. योगेश कोठारी, डॉ. कुणाल कोठारी, डॉ. उमेश कोठारी, डॉ. अतिष काळे, डॉ. अजय गर्जे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. उंबरकर आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने