माय सह्याद्री - शेवगाव

जागतिक फार्मसिस्ट दिनाचं  ( २५ सप्टेंबर ) औचित्य साधून कोरोना महामारी च्या काळात देवदूत ठरलेले डॉक्टर,  फार्मसिस्ट , यांचा कोवीड योद्धा म्हणून सन्मान करून ते करत असलेल्या रूग्ण सेवेबद्दल तालुक्यातील फार्मसिस्ट यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. 


फार्मसी कृती समिती महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष साहील पठाण यांच्या मार्गदर्शनात शेवगाव तालुका अध्यक्ष शुभम व्यवहारे व तालुका पदाधिकारी यांनी जागतिक फार्मसिस्ट दिनी हा उपक्रम शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागात राबवला. यावेळी कृती समिती पदाधिकारी युवती संघटक निकिता मुळे , सौरभ जरे,सुधाकर काळे ,प्रफुल्ला आव्हाड ,अजय धोत्रे,प्रसाद ओहळे आदी उपस्थित होते.

पुरस्कार प्रोत्साहन वाढविण्यासाठी

\कोरोना काळात अहोरात्र न डगमगता डॉक्टर व फार्मसिस्ट हे रूग्ण सेवा देत आहेत. नागरीकांनी देवदूत संबोधले आहे यांना त्यांचे कर्तव्य आहे ते अधिक जोमाने पार पाडतील व लवकरच कोरोना पासून देशवासीयांना मुक्त करतील यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. शुभम व्यवहारे - तालुकाध्यक्ष ,फार्मसिस्ट कृती समिती शेवगाव

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव

थोडे नवीन जरा जुने