My Sahyadri -  अहमदनगर  :
दहिगावने  (  ता. शेवगाव  ) जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक ,सहकार महर्षी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रेरणेतून अहमदनगर शहरातील बोल्हेगाव उपनगरात ( राघवेंद्र स्वामी मंदिर परीसरात  )  मा.आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील  व मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या दुरदृष्टीने व मार्गदर्शनातून मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य, शास्त्र व संगणक शास्त्र शाखा सर्व सोयी सुविधानियुक्त  महाविद्यालय साकारले आहे. समाजातील दुर्बल,वंचित,गोरगरीब, कष्टकरी,आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुला-मुलींना उच्चशिक्षणाची सोय करून त्यांना स्वावलंबी, सक्षम,  करणे हे या महाविद्यालयाचे उद्दिष्ट आणि ध्येय आहे. या  विचाराला अनुसरून महाविद्यालयाची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. सध्या जागतिकीकरण आणि स्पर्धेच्या युगात आजचा विद्यार्थी सर्व आव्हाने पेलण्यास समर्थ बनला पाहिजे या भूमिकेतून महाविद्यालयात सर्व भौतिक सोयी सुविधांसह गुणवत्ताधारक अध्यापक वर्गाची नेमणूक करून प्राचार्य डॉ.टी.एम.वराट यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा आज सर्वच क्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावला आहे.

महाविद्यालयात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सक्षम व प्रभावी होण्यासाठी शैक्षणिक सुविधांसह शिक्षण पूरक अनेक उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी महाविद्यालयात केले जाते. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजना, डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील,कमवा व शिका योजना,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, राज्यस्तरीय चर्चासत्र, परिसरातील पालक,शेतकरी यांच्यासाठी मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन,माजी विद्यार्थी मेळावा,पालक मेळावा, शैक्षणिक अभ्यासपूर्ण विभागीय सहली, क्रीडा स्पर्धा,तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करून वेगवेगळ्या कंपनी,बँका, यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते.

महाविद्यालयातील विविध विभाग,समित्या, मंडळे यांच्या विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त करून देण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्ग सतत कार्यतत्पर आहे. कोविड 19 चा वाढता प्रभाव पाहता चालू शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू  आहे.विद्यार्थ्यांनी www.mgpcollege.com महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरून प्रवेश निश्‍चित करावा तसेच संगणक विभागांमध्ये प्रवेशित जागा मर्यादित असल्याने आपला प्रवेश लवकरात लवकर  करावा. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी  सदैव सज्ज आहे. संस्थेचे सचिव मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे महाविद्यालयाच्या उभारणीत मोलाचा वाटा असुन घुले कुटुंबीयांच्या  मार्गदर्शनात महाविद्यालय दिवसेंदिवस प्रगती करत असुन उत्तुंग भरारी घेत आहे.

विद्यार्थी वैयक्तिक विकासावर भर- प्राचार्य
मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, स्वमालकीच्या सर्व सोयी सुविधेने परीपूर्ण इमारतीत अहमदनगर शहर परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण  शिक्षण मिळण्याचे विश्वसनीय केंद्र म्हणून विकसित होत आहे. यासाठी महाविद्यालयात अध्ययन ,अध्यापनासाठी सर्व सुविधांची उपलब्धता आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांकडे  वैयक्तिक लक्ष दिले जाते. 

प्राचार्य - डॉ.टी.एम.वराट,
 मारूतरावजी घुले पाटील महाविद्यालय, अहमदनगर. 
----------------------
महाविद्यालयातील उपलब्ध सुविधासुविधा
महाविद्यालयात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सक्षम व प्रभावी होण्यासाठी सुसज्ज वर्गखोल्या,समृद्ध ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण, पार्किंग व्यवस्था, आद्यवत प्रयोगशाळा, वनस्पती शास्त्र उद्यान,तसेच संगणक शाखेसाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट आदी सुविधांसह   महाविद्यालय परीसरात पर्यावरण पुरक व आकर्षक वृक्षराजीस प्राधान्य देण्यात आले आहे.
-----------------------

संकलन - प्राध्यापक, एस. व्ही. मरकड. ( कला शाखा प्रमुख  )

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव- अहमदनगर.
My Sahyadri Contact us- mysahyadrilive@gmail.com 
थोडे नवीन जरा जुने