माय सह्याद्री - शंकर मरकड
छावा क्रांतिवीर सेना प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत , आय टी प्रदेशाध्यक्ष किरण बोरसे , मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील राजेभोसले यांनी सोमवार रोजी शेवगाव तालुका पदाधिकारी यांच्या निवडी जाहिर केल्या यात - छावा क्रांतिवीर विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष पदी अविनाश उगले, शेवगाव तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी गणेश राजे भोसले,तालुका सरचिटणीस पदी रवी हिंगे , युवा तालुका सरचिटणीस पदी संकेत दखणे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत .यावेळी अजित उगले,आकाश गिरी,कृष्णा गरड,अभिषेक आदमाने, कृष्णा दसपुते,महेश राजेभोसले, लक्ष्मण ढवळे, धनंजय बर्डे, कृष्णा बर्डे, गणेश गरड, दीपक हिंगे, अभिषेक हिंगे, महेश दसपुते सुनील रक्ते, संदीप घुगे, संतोष देवडे,गणेश रक्ते आदींची निवडी प्रसंगी उपस्थिती होती.
आगामी काळात तालुका संघटन वाढवणार
तालुक्यातील युवक वर्ग छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून उभा करणार असून आगामी काळात गावोगावी संघटनेच्या शाखा स्थापना करणार आहे.शेतकरी, कष्टकरी, मागास, यांच्या अडचणी गाव तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून सोडण्यात पुढाकार घेतला जाऊन न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून आगामी काळात तालुका संघटन वाढवणार आहे. स्वप्नील राजेभोसले - तालुकाध्यक्ष , छावा क्रांतिवीर सेना शेवगाव.
माय सह्याद्री टीम शंकर मरकड ,अशोक वाघ, शेवगाव.