माय सह्याद्री रिपोर्ट- अहमदनगर / शेवगाव :
आपल्या देशाविषयी देशातील हरेक व्यक्तीस अभिमान असतो. जो-तो आपापल्या परीने देशहीत चिंतीत असतो. ते आपले सर्वांचे कर्तव्य ही आहे. मात्र देश संरक्षणार्थ सैनिक बनुन देश सेवा करणारा भारतीय सैनिकातील जवान एक आदर्शवत व्यक्तीमत्व असल्याचे प्रतिपादन शेवगाव तालुका कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी केले. भारतीय स्थल सेनेच्या, आर्मी मेडिकल कोअरच्या नायक पदावरून सेवानिवृत्त झालेले शेवगाव तालुक्यातील भाविनिमगावचे सुपुत्र नायक दादासाहेब रामजी शिंदे यांचा भाविनिमगाव ग्रामस्थ, आप्तेष्ट व मित्र परिवार यांच्या वतीने भाविनिमगाव येथे सपत्नीक ( दादासाहेब - प्रियाताई ) सत्कार करण्यात आला. यावेळी भारत भूमीच्या सेवाआर्थ मुलाबरोबर सत्कार स्वीकारताना आम्ही एका जवानाचे आई वडील असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे उद्गार जवान दादासाहेब शिंदे यांचे वडील रामजी शिंदे व मातोश्री सिंधुबाई शिंदे यांनी काढले.
यावेळी नायक दादासाहेब शिंदे यांच्या कार्याचा शेवगाव पंचायत समिती माजी सभापती त्रिंबक जाधव सर, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त मेजर कुमार शिंदे, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, पैठण नाथ विद्यालयाचे प्राध्यापक शिवव्याख्याते संजय काळे पाटील, नेवासा पंचायत समिती अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, शेवगाव काकडे विद्यालयाचे प्राध्यापक सुहास चव्हाण, मेजर शंकर शिंदे व किरण शिंदे यांनी शाब्दिक गौरव आपले मनोगत व्यक्त करताना केला. यावेळी माजी सरपंच लक्ष्मणराव शिंदे, सरपंच पांडुरंग मरकड, डॉ. शंकरराव जाधव, अॅड. धर्मराज काकडे, संतोष कदम, अविनाश परभणे, माजी सरपंच श्रीकृष्ण काळे, सेवा सोसायटी व्हा. चेअरमन संजय शेळके, गंगामामा जाधव, जालिंदर चेडे,सिताराम तोरमड, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, मित्र परिवार या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी घेत हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठाण उपाध्यक्ष प्रा. नंदकुमार शेळके यांनी केले.
नायक दादासाहेब शिंदे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करताना भाविनिमगाव येथील जगदंबा क्रिकेट क्लब सदस्य
माय सह्याद्री टीम शंकर मरकड ,अशोक वाघ ,शेवगाव.