माय सह्याद्री- अहमदनगर नेवासा:
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी शिवारात आतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे प्रंचड नुकसान झाले असून सदर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी चिलेखनवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत यांनी तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिलेखनवाडी शिवारात तीन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर येवून नदीकाठची सर्व पिके भूईसपाट झाली.
वादळी वाऱ्यामुळे ऊस, बाजरी, तूर पिके आडवी झाली. तर अति पावसाने हातातोंडाशी आलेले पिक भूईसपाट झाल्याने कोरोना माहामारीने भयभीत झालेले शेतकरी आणखी संकटात सापडल्याने हवालदिल झाले आहेत. सदर शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी. असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत, उपसरपंच नाथा गुंजाळ, सोसायटीचे चेअरमन निवृत्ती वाघमोडे, व्हा. चेअरमन प्रल्हाद कांबळे, सूर्यकांत पाडळे, अनिल दुकाळे, सचिन वाघमोडे, देविदास सावंत,दत्तू भातं बरे, काकासाहेब गायकवाड, अरुण सावंत, दविदास दळवी, सुभाष सावंत, अजीज शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माय सह्याद्री टीम शंकर मरकड ,अशोक वाघ ,शेवगाव.