दहिगावने कृषी विज्ञान केंद्रात पोषण आहार माहिती अभियान कार्यक्रम संपन्न.

अहमदनगर  शेवगाव:
आपल्या उत्तम आरोग्यासाठी सकस व पोषक आहाराची गरज असते कारण हाच पोषण आहार शरीरास रोग प्रतिकारक्षम बनवतो असे मत अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्रात आयोजित राष्ट्रीय पोषण महिना जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होत्या. १ ते ३० सप्टेंबर २०२० हा कालावधी राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केेला जात आहे . महिलांमध्ये पोषणाबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी या महिन्यामध्ये शासकीय स्तरावर विविध विभागांमार्फत, अंगणवाडी व शेतकरी महिलांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन  भारत सरकार कडून करण्यात आले आहे. 

याचाच एक भाग म्हणून कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-नेत १७ सप्टेंबर  रोजी अंगणवाडी व शेतकरी महिलांसाठी पोषण जनजागृती व पोषण परसबागेसाठी भाजीपाला बियाणाचे वाटप  कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले होते. कार्यक्रमास दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. शामसुंदर कौशिक ,  डॉ.दिप्ती पाटगावकर , डी.बी. देसाई, सोपान ढाकणे, आरोग्य अधिकारी डॉ.कैलास कानडे, दहीगाव-ने सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाउलबुद्धे, रांजणी सरपंच मनीषा घुले, खामगाव  सरपंच केदार आगळे,  दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे  शास्त्रज्ञ , कर्मचारी व महिला वर्ग उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंस राखत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी केले तर आभार इजि. राहुल पाटील यांनी व्यक्त केले .

प्रतिनिधी अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने