अहमदनगर नेवासा:
शिरसगांव ( ता. नेवासा ) विदयालयाचा दहावी निकाल ९७:८७ टक्के . अहमदनगर - नेवासा नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे वकिलराव लंघे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा दहावी परिक्षेचा ९७ . ८७ टक्के असा उत्कृष्ट लागला आहे. विद्यालयाची विद्यार्थीनी गीता लक्ष्मण गागंर्डे ९५.२०टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.
द्वितीय क्रमांकावर पूनम वसंत जाधव ९३.६० टक्के गुणासह तर तुतीय क्रमांक महिमा चंद्रकांत जाधव ९३ . ०० टक्के गुण मिळवून मिळवला. तर साक्षी जयशिंग खंडागळे ९२.४०टक्के गुण मिळवून चौथ्या तर पाचवा क्रमांक श्रुती प्रभाकर लंघे हिने ९२ .०० टक्के गुण मिळवून मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब धनवटे , शिक्षक संजय भुसारी, दत्तात्रय जरे, महेश देशमुख, श्रीहरी वीर,सुयोग घोरपडे, महेश गाढे , लेखनिक दादासाहेब निळ , दिपक पठाडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.डॉ. नरेंद्रजी घुले ,संस्थेचे उपाध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले , जि.प अध्यक्षा.ना.सौ.राजश्रीताई घुले , शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले , माजी जि.प अध्यक्ष विठ्ठलराव लंघे ,संस्थेचे सचिव अनिलराव शेवाळे,सहसचिव काकासाहेब शिंदे, संस्थचे प्रशासकीय अधिकारी दिनकरराव टेकणे , समन्वयक डॉ. रामकिसन सासवडे , माजी मुख्याध्यापक जनार्दन भागवत , शिरसगावचे सरपंच छगनराव खंडागळे, उपसरपंच दत्तात्र्यय पोटे, वसंत ( बापु) देशमुख, फक्कडराव देशमुख, पोटे टेलर, विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब धनवटे , शिक्षक संजय भुसारी, दत्तात्रय जरे, महेश देशमुख, श्रीहरी वीर,सुयोग घोरपडे, महेश गाढे , लेखनिक दादासाहेब निळ , दिपक पठाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .