अहमदनगर - शेवगाव
शिरसगाव येथील सखाराम पाटील सेवाभावी संस्थेने केला कोवीड योध्दा म्हणून गौरव.
शिरसगाव ता. नेवासा येथील स्व. सखाराम बाळा आगळे पाटील सेवाभावी संस्थेने शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील दैनिक वृत्तपत्र पत्रकार शंकर सोन्याबापू मरकड यांना कोवीड योध्दा सन्मान पत्र देेेऊन त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे. कोरोना संकटसमयी एक जबाबदार सामाजिक घटक म्हणून मरकड हे करत असलेल्या वृत्तपत्र वितरण , कोरोना पार्श्वभूमीवर केलेले वृत्तपत्रातील वार्तांकन व सोशल मीडिया माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना कोवीड १९ या महामारीच्या काळात गरज असलेल्या जनजागृती व खबरदारी म्हणून केलेल्या कामाचा गौरव करण्याचे ठरवून कोवीड योध्दा म्हणून सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक आगळे पाटील यांनी सांगितले.
पत्रकार शंकर मरकड यांना कोवीड योध्दा म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, छायाचित्र संघटना तालुकाध्यक्ष सोपान जाधव, सरपंच पांडुरंग मरकड, जगदंबा माता प्रतिष्ठाण अध्यक्ष संजय काळे, उपाध्यक्ष नंदकुमार शेळके, मार्गदर्शक प्रा. आण्णासाहेब काटे, राजु शिंदे, अमोल काटे, तालुका, जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या विविध पत्रकार संघटना पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.