अहमदनगर - पाथर्डी 

गाडे कुटुंबातील धनंजय च्या शिक्षणाची उचलली जबाबदारी.

पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथील संजय गाडे व योगिता गाडे या दाम्पत्याचे नुकतेच रस्ता अपघातात अकाली निधन झाले. मातृपितृ असे दोन्ही छत्र हरपलेली त्यांची मुले ऋतुजा, प्रतीक्षा व धनंजय ही निराधार झाली असुन मोठ्या संकटात ही मुले सापडली आहेत. 

आकस्मात संकटात सापडलेल्या या मुलांना पाथर्डी स्थीत नवजीवन बालकाश्रम या संस्थेने मायेचा हात दिला असून मयत संजय व योगीता गाडे यांचा धनंजय या 10 वीत शिकणाऱ्या मुलाच्या संगोपनाची व शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. 

महाराष्ट्र शासन मान्य असलेल्या नवजीवन बालकाश्रम संस्था अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था समाजातील निराधार, निराश्रित, एकच पालक असलेली मुले, विधवा/परित्यक्ता यांची मुले तसेच ऊसतोड व वीटभट्टी कामगार पालक असलेल्या आणि समाजातील इतर वंचित घटकांतील मुलांसाठी गेल्या 10 वर्षांपासून संस्थेच्या वतीने गरजवंतांसाठी नवजीवन बालकाश्रम चालविले जाते. 

या बालकाश्रमा मध्ये गाडे कुटुंबातील संजय व योगिता गाडे यांच्या अकाली निधनाने निराधार झालेल्या धनंजयच्या संगोपन व शिक्षणाबरोबरच अनाथ झालेल्या ऋतुजा व प्रतीक्षा यांना सर्वोतोपरी मानसिक आधार देऊन त्यांच्या लग्नासाठीही सर्वोतोपरी मदत करण्याची जबाबदारी नवजीवनने घेतलेली आहे. नुकतेच नवजीवन चे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव बोर्डे व प्रा.दिगंबर गाडे अधिक्षक रवींद्र पवार, प्रथम सोनवणे, पप्पू बोर्डे, यांनी कळसपिंपरी येथे गाडे यांच्या राहत्या घरी जाऊन गाडे कुटुंबातील अनाथ झालेल्या मुलांचे सांत्वन केले. 

त्यांना धीर दिला व सर्वोतोपरी मदत करण्याचे सांगितले या वेळी भगवान सोनवणे, प्रभाकर सोनवणे व मुलांचे आजोबा भिमराज गाडे, आजी कलाबाई गाडे आदी उपस्थित होते. 

संस्थेचा मुलांना आधार

अतिशय गरीब असलेल्या गाडे कुटुंबातील दोन्ही कर्ता व्यक्ति गेल्याने या कुटुंबातील वयोवृद्ध व मुले निराधार झाले आहे. दोन मुली उपवर असुन मुलगा लहान असल्याने व परिस्थिती पाहून मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली असून मुलींच्या लग्नातही संस्था मदत करणार आहे. रवींद्र पवार - नवजीवन बालकाश्रम संस्था अधिक्षक पाथर्डी

माय सह्याद्री - मंगेश शेरकर, कासारपिंपळगाव.


थोडे नवीन जरा जुने