अहमदनगर -शेवगाव
दहिगावनेत साठे जयंती साजरी, ऑरो प्लॅटचा शुभारंभ
स्वातंत्र्य चळवळीत संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे योगदान देणारे थोर विचारवंत, आण्णा भाऊ साठे यांनी समाजसुधारनेत मोठे लक्षणीय काम केले असल्याचे प्रतिपादन सभापती डॉ क्षितिज घुले यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतुन दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या ऑरो प्लॅटचा शुभारंभ सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले 

यावेळी ते बोलत होते. यावेळी अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त डॉ घुले, जहांगीर शेख यांनी साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सरपंच सुभाष पवार, सुर्यकांत पाउलबुध्दे, सदस्य भारत घोडके ,पांडुरंग खंडागळे ,विकास  कसबे , दिलदार शेख ,श्याम कांबळे , सचिन खंडागळे, देवदान कांबळे आदींसह नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत  सदस्य पांडुरंग खंडागळे यांनी आभार व्यक्त केले.

माय सह्याद्री टीम - शेवगाव
थोडे नवीन जरा जुने