अहमदनगर शेवगाव :
यंदा जुन महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या चांगल्या पावसाने खरीप हंगामातील पिकाची पेरणी वेळेवर झाल्याने व सतत कमी जास्त प्रमाणात होत राहिलेल्या पावसाने खरीप चांगलाच बहरला असुन ब-यापैकी क्षेत्रावर पेरा झालेल्या मुगाचे शेत शेंगा अवस्थेत आले आहे. कपाशी, तुर, बाजरी पिकाची जोमदार वाढ सुरू असुन आजच्या घडीला यंदाचा खरीप चांगलाच बहरला आहे.
सुरवातीपासून जोरदार व सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात जमीनीतील पाणी पातळी वाढली असून भीज पावसाचा हा परिणाम असुन अजून मोठ्या प्रमाणात जोरदार व मोठ्या प्रमाणात पाणलोट होणाऱ्या पावसाचे दिवस अजून शिल्लक असल्याने आत्ताच होत असलेल्या सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.