युरिया खरेदीत शेतकऱ्यांची फसवणुक नको- विवेक मोरे 
अहमदनगर - पाथर्डी युरीया खताचा काळाबाजार झाल्याने शेतकऱ्यांना युरीया खताची टंचाई भासली असुन इतर खताबरोबर युरीया घेण्यास सक्ती, जास्तीच्या दराने केली जाणारी विक्री, कृषी केंद्र चालकांकडून युरीया उपलब्ध न होने, आदी प्रकारे होणारी फसवणुक कुठेतरी थांबली पाहिजे.जर युरिया प्रकरणी कृषी सेवा केंद्राकडुन फसवणुक होत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची लुट होऊन देणार नाही तर अशा घटनेला कृषी विभागाला जबाबदार धरून आवाज उठवला जाईल असे पाथर्डी स्वाभीमानी युवक संघटनेचे तालकाध्यक्ष विवेक मोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 
यंदा पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने शेत शिवार खरीप पिकांनी फुललेल आहे . अशात रासायनिक खताची मात्र देणे गरजेचे आहे पाऊस चांगला पडल्याने आपसुकच खताचा डोस नेहमी पेक्षा थोडा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकाला दिल्याचे दिसून येत आहे. मात्र या वर्षी युरीया खताचा मोठा तुटवडा ऐन खताचा डोस देण्याच्या कालावधीत भासल्याने व कृषी सेवा केंद्राकडुन होणारा युरीया खताचा कमी पुरवठा यामुळे अनेक शेतकरी युरीया खता पासून वंचित राहिलेले आहे. मात्र येथुन पुढे ज्या सेवा केंद्रात युरिया उपलब्ध होईल त्याठिकाणी कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित असले पाहिजे. फसवणुक किंवा किमती पेक्षा जास्त भावाने खते विक्री होईल अशा कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी ही मोरे यांनी केली आहे. 

 माय सह्याद्री 
मंगेश शेरकर ,कासारपिंपळगाव, पाथर्डी अहमदनगर 
My Sahyadri Contact us- mysahyadrilive@gmail.com 
थोडे नवीन जरा जुने