जेष्टा गौरी Jyeshta Guri 2020 :
गणेशोत्सवात महिला वर्ग आतुरतेनेवाट पाहतात ती जेष्टा गौरी (महालक्षमी) पूजनाची महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात हा एक उत्सव आहे. या वर्षी जेष्ठ गौरी पूजन या वर्षी 25 ऑगस्ट रोजी असुन (25 August 2020 ) भाद्रपत शुक्ल रोजी जेष्टा गौरी चे आवाहन केले जाते. 26 ऑगस्ट रोजी पूजन करुन नैवेद्य ठेवले जातात . 27 ऑगस्ट रोजी पूजा आरती करुन जेष्टा गौरी विसर्जन केले जाते. या उत्सवाला काही भागात महालक्षमी पूजन म्हटले जातात. यात देवी पुढे सजावट करुन सर्व प्रकारचे फळे , फुले , पदार्थ, खेळणी, लाईट माळा, पुष्प इत्यादींची सजावट केली जाते.तीन दिवसाचा हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो.
जेष्ठा गौरी आवाहन व विसर्जन मुहूर्त
25 ऑगस्ट रोजी जेष्टा गौरी आवाहन दुपारी 1.58 नंतर
26 ऑगस्ट रोजी गौरी पूजन , नैवेद्य
27 ऑगस्ट रोजी गौरी विसर्जन मुहूर्त दुपारी 12.36