अहमदनगर - शेवगाव
दहिगावने येथे डॉ क्षितिज घुले फाऊंडेशन वतीने सदस्य वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन
आजची तरुणाई भरकटत असल्याचे निदर्शनास येत असून सामाज उपयोगी कामातील त्यांचा सहभाग नगण्य दिसत आहे. वाढदिवस हे तर तरुणईचे फॅड होत चालले आहे मात्र सामाजीक जाणिवेतून वाढदिवस हे विधायक उपक्रम राबवून साजरे करण्यात आले पाहिजे असे प्रतिपादन दहिगावने येथील दन्धेश्वर शिवालयाचे प्रमुख ह. भ. प . कृष्णदेव महाराज काळे यांनी केले.
येथील डॉ. क्षितिज घुले फाऊंडेशनचे सदस्य गव्हर्नर कॉन्ट्रॅक्टर अविनाश मरकड पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मठ परीसरात देशी वड वृक्षाची लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे, ह.भ.प. नवनाथ महाराज काळे, अविनाश मरकड, सुरज पानकर, सागर पाऊलबुध्दे, अक्षय काशीद, धनंजय घुले, नवनाथ वारुळे, कुमार मरकड, सागर काळे ,प्रीतम टाक,शुभम लोखंडे,सागर लोखंडे, संदिप सकुंडे ,अक्षय काळे,अप्पासाहेब खंडागळे, महेश सकूंडे,मयुर रासने,योगेश पवार,विकास जगताप,सागर कसबे,कृष्णा नलावडे,श्रीहरी काळे, ज्ञानेश्वर गर्जे ,सुनील पवार, पत्रकार शंकर मरकड आदी उपस्थित होते. आभार अविनाश मरकड यांनी मानले.
फाऊंडेशन काम सामाजिक जाणिवेतून.
डॉ क्षितिज घुले फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच सामाजिक जाणिवेतून लोकोपयोगी, सांस्कृतिक, स्पर्धात्मक कार्यक्रमाचे वेळोवेळी आयोजन करून सामाजिक कर्तव्य पार पाडले जाते. समाजाप्रती आपण काही देणे लागतो या हेतूने आपल्या हातून समाजकार्य घडले पाहिजे. या हेतूने फाऊंडेशन काम करत आहे.
सुरज पानकर , सागर पाऊलबुध्दे- सदस्य, डॉ क्षितिज घुले फाऊंडेशन दहिगावने.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड ,अशोक वाघ ,शेवगाव.