अहमदनगर / शेवगाव : 

नागरीकांनी आपल्या गावच्या विकासासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र आले तरच गावचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी आज मळेगाव येथे केले. शेवगाव तालुक्यातील मौजे मळेगाव येथे जिल्हा परिषदेच्या जन सुविधा योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन लाडजळगाव गटाच्या जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी १२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. यावेळी सोशल डिस्टंगसिंग चे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सौ. काकडे म्हणाल्या की, सध्या मोठ्याप्रमाणात कोविड -१९ ची साथ चालू आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून आपण सर्वजण या आजाराला हरवणार आहोत.

मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून सर्वांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तुमच्या गावातील अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुमच्यामध्ये एकी पाहिजे. तुम्ही पक्षीय जोडे बाजूला ठेवा प्रश्न सुटतात. राजकारण हा माझा पिंड नाही. समाजकारणात मला काम करायचे आहे व ते चालू आहे. मी काम करताना ‘हा माझा, तो तुझा’ असा भेदभाव करत नाही. सर्वसामान्य जनता हेच दैवत मानून आम्ही काम करतो. म्हणून जनतेने आम्हाला आज पर्यंत साथ दिली आहे. तुमचे गावातील एकी पाहून चांगले वाटेल. अशीच एकी कायम ठेवा तुमचे लहान मोठे प्रश्न त्यामुळे मार्गी लागू शकतात असे सौ. काकडे मार्गदर्शन करताना म्हणाल्या. श्रीकांत निकम यांनी यावेळी सांगितले की, या गावात काही वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही. पाटाला पाणी टेलमुळे व्यवस्थित येत नाही. पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत. त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. तुमचे कामाचा झपाटा आम्हाला माहित आहे. तुम्ही या गटाच्या सदस्या नसुन देखील तुम्ही आमच्या गावाला ग्रामपंचायत कार्यालय दिले. तुमचे गावकऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. यावेळी चंद्रकांत निकम, देवराव दारकुंडे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब वाणी यांनी तर सरपंच रघुनाथ सातपुते यांनी आभार मानले. 

माय सह्याद्री टीम -  शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव

थोडे नवीन जरा जुने