अहमदनगर पाथर्डी :
महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी इयत्तेचा वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर (कासारपिंपळगाव ) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९५.९१ टक्के लागला असुन विद्यालयाची विद्यार्थीनी पुजा महेश तुपे ८९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर साक्षी संजय गोंधने ८३.४० टक्के गुणासह द्वितीय आणि शितल नवनाथ शिंदे व स्वप्निल दादासाहेब चितळे हे दोन विद्यार्थी ८३..६० टक्के गुणासह संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असुन यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, संस्था चालक भास्कर गोरे, मुख्याध्यापक बाळासाहेब ताटे, सरपंच मोनाली राजळे आदींसह पालक, शिक्षक यांनी कौतुक केले आहे.
माय
सह्याद्री टीम
मंगेश शेरकर - कासारपिंपळगाव पाथर्डी