अहमदनगर - पाथर्डी
भारतीय जनता पक्षाने नुकताच अहमदनगर जिल्हा पक्ष विस्तार केला असून विविध पदावर सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. यात पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ - मानेवाडी गावचे विद्यमान सरपंच धनंजय दगडु बडे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
परीसरातील जोगेवाडी, वडगाव, चिंचपूर पांगुळ, ढाकणवाडी, मानेवाडी आदी पंचक्रोशीतुन
प्रथमच जिल्हा पक्ष कार्यकारीणीत धनंजय बडे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. याआधी तालुका स्तरावर कार्य करण्याचा अनुभव असुन त्यांच्या निवडीबद्दल परिसरातील भाजप कार्यकर्त्या मध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पाथर्डी तालुका माजी आमदार दगडु पाटील बडे यांचे धनंजय चिरंजीव आहेत या निवडीनिमित्त सरपंच धनंजय बडे यांचा पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी सन्मान करण्यात येत आहे.
माय सह्याद्री टीम
मंगेश शेरकर -पाथर्डी, अशोक वाघ, शेवगाव.