महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील दहिफळ हायस्कूल निकाल १०० टक्के असा उत्कृष्ट लागला असून शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असुन येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या अंकुश चंद या विद्यार्थ्यांने ८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
हायस्कूलचा विद्यार्थी युवराज पांडुरंग हाके ८५ गुण मिळवून प्रथम, अंकुश ज्ञानदेव चंद ८३ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि शेख समीना सलीम ८० टक्के गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हायस्कूलचे दहावी परीक्षेस ३३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहे
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था प्रमुख अॅड शिवाजीराव काकडे , जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, शैक्षणिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बिटाळ , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. काकडे एस एच , शिक्षक , पालक व ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.