अहमदनगर - शेवगाव 
दहा सांडवेपिचिंग निखळले, शेतीपीकात घुसले पाणी, पिकाचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी.
 शुक्रवार रोजी रात्री तीन तास झालेल्या अतीजोरदार पावसाने शेवगाव तालुक्यातील जोहरापुर येथील साखळी बंधा-याचे दहा सांडवेपिचिंग वाहुन गेले असुन लोकसहभागातून उभारलेल्या या साखळी बंधा-यातुन अती प्रमाणात पाणी वाहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात या बंधा-याचे पाणी घुसल्याने व ते पाणी वाहिल्याने शेतीपीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची गरज आहे. 

परीसरातील विहिर, बोअरवेल आदी पाणी स्त्रोतास वरदान ठरलेले हे साखळी बंधा-याचे सांडवेपिचिंग वाहुन गेल्याने पाणी साठवण होणार नसून परीसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी फायदेशीर ठरलेले हे बंधारे रात्री झालेल्या पावसाने नुकसान ग्रस्त झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुठल्याही शासकीय मदतीवीना लोकसहभागातून उभारलेल्या या बंधा-याचे मोठे नुकसान झाले आहे. ते नुकसान आता शासकीय योजनेतुन भरून काढण्याची गरज आहे. भातकुडगाव जोहरापुर या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना रोडला खदानी नसल्याने पावसाचे पाणी साठवण्यास जागा नसल्याने पावसाचे पाणी शेतात साचत असुन जास्तीचे पाणी शेतीतच साचत असल्याने शेतीपीकाचे नुकसान होत आहे.

  पिकाचे पंचनामे करा - देवढे
या परिसरात अती जोरदार पाऊस पडला असुन पाणी शेतातून वाहिल्याने मोठ्या प्रमाणात शेती बांद खंगाळले आहे. शेती माल कपाशी, बाजरी, तुरी, भुईमुग, मुग, डाळिंब बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या पिकाचे पंचनामे त्वरित करण्यात येऊन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी नुकसान भरपाई साठी प्रयत्न केले पाहिजे. अशोकराव देवढे - सरपंच जोहरापुर

माय सह्याद्री टीम शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने