अहमदनगर- शेवगाव 

आज कोरोना पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनी शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील घुले विद्यालयात ज्ञानेश्वर सह. साखर कारखाना चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी ध्वजारोहण केले. कोरोना पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन मोजक्या शिक्षक व नागरिक  यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर घुले पाटील उपस्थित होते. 

यावेळी पारंपरिक पद्धतीच्या कार्यक्रमास बंदी असल्याने सोशल डिस्टंस पाळत झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, सरपंच सुभाष पवार , ग्रामपंचायत सदस्य, शालेय शिक्षक, मोजके विद्यार्थी आणि प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने