मुंबई:
सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन रोज नवीन रुग्ण आढळून येत आहे हि मोठी चिंतेची बाब आहे. करोनारुग्णांसाठी महाराष्ट्र सरकार सर्व उपाय योजना करत आहे त्यात कोविड व क्वारंटाइन सेंटर उपलब्ध करुन दिले आहेत.तसेच ऑक्सिजन बड्स उपलब्ध केले आहे
या संकटकाळातच टाटा सन्स tata sons कडून मुबंई मनपा ला प्लाझ्मा थेरपीसाठी मोठी मदत केली आहे यात 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्स आणि 10 कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याची माहिती मिळाली आहे.
या परिस्थितीत टाटा सन्स कडून पुन्हा एकदा मोठी मदत मिळाली आहे सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर या संकटावर लवकरच मात करुन व महाराष्ट्र लवकरच करोना मुक्त करु अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
या वेळी उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.