अहमदनगर - शेवगाव
स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भेंडा येथील कारखाना समाधी स्थळावर माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील, ज्ञानेश्वर कारखाना चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, सभापती डॉ क्षितिज घुले पाटील यांनी मोजक्या मंडळी च्या उपस्थितीत स्वर्गीय घुलेंना आदरांजली वाहीली.
तसेच अहमदनगर येथील मारुतरावजी घुले पाटील महाविद्दलयाचे प्राचार्य डॉ. टि. एम. वराट महाविद्यालयात प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन केले . याप्रसंगी प्रा. डॉ.के.आर.पिसाळ, एस.बी.दहातोंडे , न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगरचे किरण सुपेकर , प्रशासकीय कर्मचारी पी. व्ही.दळवी ,ए.के.आहेर, टी.आर.तेलधुणे,शामा वाळके आदी उपस्थित होते.
दहिगावने येथील मारूतरावजी घुले पाटील महाविद्यालयात
स्व . घुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी माजी प्राचार्य के. वाय. नजन, दहिगावने घुले महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. डी एन वाबळे प्राध्यापक निलेश खरात , विकास थोरात आप्पासाहेब खंडागळे, ज्ञानेश्वर वारुळे, महेश शेजूळ , संदीप नलावडे, बाबासाहेब घुले , जालिंदर चितळे , सोमनाथ नीळ , दत्ता घुले आदी उपस्थित होते.
देवटाकळी येथील जिजामाता विद्यालयात सरपंच ज्ञानदेव खरड , उपसरपंच अशोकराव मेरड , जनार्दन वाघमारे , मुख्याध्यापक कल्याणराव मडके यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून स्वर्गीय घुले यांना अभिवादन केले या वेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच
सुलतानपुर सेवा सोसायटी व ग्रामपंचायत वतीने स्वर्गीय घुले यांना आदरांजली वाहण्यात आली
जेष्ठ सभासद भाऊसाहेब पवार , चेअरमन बबन जगदाळे, सरपंच सतिष धोंडे, गणेश जगदाळे, हनुमान जगदाळे ,पो.पाटील आबासाहेब वाघ, कल्याण जगदाळे ,आप्पासाहेब सुकासे, सतिश घोडखिंडे आदी उपस्थित होते.
हिंगणगाव येथेही स्वर्गीय घुले पाटील यांना प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदिप बामदळे यांच्या सहकार्याने नागरीकांनी आदरांजली वाहीली.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.