शेवगाव राष्ट्रीय महामार्गाच्या ड्रेनेज गटारीचे अपूर्ण काम  पिकाचे मोठे नुकसान झाले आहे

अहमदनगर - शेवगाव :
शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे निवेदन

अहमदनगर - शेवगाव राष्ट्रीय महामार्गाच्या ड्रेनेज गटारीचे अपूर्ण कामामुळे दोन किलोमीटरच्या परिसरातून ड्रेनेजद्वारे आलेले पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहील्या असुन तूर ,कापूस ,मका, बाजरी इत्यादी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी व भविष्यातील होणाऱ्या शेत जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजनां करावी अशा मागणीचे निवेदन नुकसान गस्त शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगाव तालुका यांनी तहसीलदार अर्चना भाकड यांना दिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगाव तालुका यांनी तहसीलदार अर्चना भाकड यांना दिले आहे.


तलाठी, सर्कल ,प्रांताधिकारी माननीय कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग औरंगाबाद ,राष्ट्रीय महामार्ग विभाग माजलगाव ,माननीय प्रकल्प व्यवस्थापक कंपनी पारगाव तालुका शिरूर जिल्हा बीड यांकडे पाठपुरावा करण्याची व शेतकऱ्यांना न्याय देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने न्याय न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांवरील अन्याय विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण म्हस्के पक्ष तालुकाध्यक्ष प्रशांत भराट जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, भोसले मेजर ,युवा नेते प्रशांत घुमरे,प्रथम सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे यावेळी शेतकरी उपस्थित होते.


उपाययोजना करा अन्यथा आंदोलन - घुमरे
शेतजमीन व शेतीमालाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शेत जमिनीचे पुढील नुकसान टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा अन्यथा भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करणार प्रशांत घुमरे - तालुका उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष.शेवगाव 

माय सह्याद्री टीम शंकर मरकड ,अशोक वाघ ,शेवगाव.

थोडे नवीन जरा जुने