अहमदनगर - शेवगाव
शिवबा संघटनेचे मुख्यमंत्री यांना पत्र, गुन्हा दाखल न करण्याची मागणी.
समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी काही समाजकंटकांनी महाराजां विरोधात संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला आहे. या विरोधात शिवबा संघटनेने मुख्यमंत्री ठाकरे यांना ई मेल द्वारे पाठवलेल्या पत्रात खोटा गुन्हा दाखल करू नये अशा आशयाचे निवेदन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ केसभट यांनी पाठवले आहे.
गुन्हा नोंदवण्याची प्रकिया सुरू केली असुन काही जळाऊ वृत्तीच्या लोकांकडून महाराजांवर आणि हिंदू धर्म, संस्कृतीचे संवर्धन प्रचार आणि प्रसार करणार्यांवर, खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणुन सर्व समाजबांधवांनी आणि हिंदु धर्मरक्षक यांनी वेळीच जागृत होऊन हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शिवबा संघटनेच्या माध्यमातून हरिभाऊ केसभट यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लेखी निवेदन दिले आहे.
सरकारने तत्काळ याप्रकरणी लक्ष घालून इंदुरीकर महाराजांवर गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी अन्यथा जनतेची सहनशीलता संपल्यास महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे. मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड ,अशोक वाघ , शेवगाव
Official Facebook My Sahyadri
contact us- mysahyadrilive@gmail.com