शेवगाव भातकुडगाव कोरोना रुग्ण

अहमदनगर - शेवगाव
शेवगांव तालुक्यातील ग्रामीण भागात भातकुडगांव येथील ३० वर्षिय युवक कोरोना पाँझिटीव्ह आढळुन आल्याने परीसरात कोरोना धाकधूक वाढली आहे. पॉझिटिव्ह युवक पालघर येथे एस .टी. महामंडळात चालक म्हणुन कार्यरत आहे. रविवारी २८ रोजी तो पालघर येथुन भातकुडगांव येथे गावी आला होता. बुधवारी त्यास जिल्हा रूग्नालयात तपासणीसाठी दाखल केले . त्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती समजताच भातकुडगांव येथील व्यावसायिकांनी स्वतः हुन दुकाने बंद केल्याने दहा मिनिटातच वर्दळीच्या चौकात व इतर ठिकाणी शुकशुकाट पसरला होता . पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपकातील ८ व्यक्तींना शेवगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्लाब तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय आधिकारी सुप्रिया लुणे यांनी सांगितले.शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड यांनी दि.१३ जुलै पर्यंत भातकुडगाव गाव सिमा बंद करून लॉकडाऊन सुचनाचे आदेश देण्यात आले आहेेत.

 भातकुडगाव फाटाही बंद
भातकुडगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने दहा दिवस गाव बंद करण्यात आले आहे. तसेच तीन किमी अंतरावर शेवगाव नेवासा मार्गावर असलेल्या फाट्यावर ही बंद ठेवण्यात आला आहे. हा फाटा व्यावसायिक ठिकाण असून भातकुडगाव गाव चे बरेच व्यावसायिक या ठिकाणी येत असल्याने हे ठिकाण हि बंद करण्यात आले आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या ससंपर्कातील ८ व्यक्ती ंचे रिपोर्ट ( निगेटिव्ह ) येईपर्यंतच ३दिवस भातकुडगाव फाटा बंद ठेवावा असी मागणी येथील व्यावसायिकांमधून होते आहे.

माय सह्याद्री टीम शंकर मरकड /अशोक वाघ ,शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने