भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे यांनी नुकतीच भाजपा तालुका कार्यकारिणी जाहीर केली . कार्यकारिणीमध्ये भाजपाचे भातकुडगाव येथील युवा नेते विजय नजन यांची शेवगाव तालुका भटक्या-विमुक्त आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी तर रांजणी येथील आसाराम न-हे यांची तालुका चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. न-हे यांना नव्याने संधी देण्यात आली असून विजय नजन यांनी या आधी युवा मोर्चा अध्यक्ष नितीन फुंदे यांच्या कार्यकारणीत युवा मोर्चा सरचिटणीस म्हणुन काम पाहीले आहे.
विजय नजन व आसाराम न-हे हे परीसरात आमदार मोनिका राजळे यांचे विश्वासु व निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या निवडीचे आमदार मोनिका राजळे तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे , डॉ अरूण पवार, नगरसेवक महेश फलके ,बापुसाहेब पाटेकर , उदय शिंदे, लक्ष्मण काशीद , आप्पासाहेब सुकासे आदींनी अभिनंदन केले आहे.
जबाबदारी यशस्वी पार पाडु
पक्षाने विश्वासाने सोपवलेली जबाबदारी कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न आमदार मोनिकाताई राजळे व तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोंढे यांचे मार्गदर्शनात करून पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया नुतन पदाधिकारी नजन व न-हे यांनी व्यक्त केली.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.