नेवासा तालुक्यातील शिरसगांव येथील स्व. सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेला नुकतेच ISO नामांकन मिळाले .
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या संस्थेचा कारभार अंत्येत चांगल्या पद्धतीने चालू असुन संस्थेला तिन राज्य स्तरीय सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.हि सामाजिक संस्था सामाजिक. शैक्षणिक.कला. क्रीडा. वृक्षारोपण. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च. कोविड १९ सारख्या परिस्थितीत गरिबांना मोलाची साथ व महत्त्वाची भूमिका या संस्थेने निभावली तसेच वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी मदत .
अन्नदान कपडे.तसेच शाळेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तके.कुपोशित बालकांना पोषण आहार.मुक बधिर मुलांना वह्या पुस्तके व कपडे ईत्यादी सर्व सामाजिक कामांच्या जोरावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी आपल्या स्व. सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेला आपल्या मेहनतीच्या जोरावर ISO प्रमानपत्र मिळाले असुन जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष.ना. विठ्ठलरावजी लंघे पाटील व मा आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक आगळे पाटील यांनी संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.मा.ना. विठ्ठलराव लंघे पाटील व.मा.आ.बाळासाहेब मुरकुटे पाटील जिल्हा परिषद सदस्या डॉ तेजश्री ताई लंघे व पंचायत समिती सदस्या सौ.सुषमा ताई संजय खरे यांनी दिपक आगळे पाटील व संस्थेचे अभिनंदन केले.