आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली.

पंढरपूर : 
आषाढी एकादशी निमित्ताने मोठी गर्दी न करता या वर्षी मोजक्या भक्तांच्या उपस्थित ही महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली. 


या वर्षी वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणारे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे सपत्नीक यांना माण मिळाला आहे. या वेळी उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, वारकरी विठ्ठल बडे उपस्थित होते.



जांभळ्या, गुलाबी , पांढऱ्या फुलांनी आषाढ शुद्ध एकादशी निमित्त आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यास सुंदर फुलांनी सजवले होते. विठूरायाचे सुंदर प्रसंन्न रुप.....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोरोना संकटातून लवकर बाहेर काढ  अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली.

कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आषाढी एकादशी निमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी आहे. यामुळे यंदा विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे.
30 जून ते 2 जुलैच्या मध्येरात्रीपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. 

सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने