नाशिक  :
आज राज्यभर दूध उत्पादक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध बंद आंदोलन झालं.या आंदोलनाचा नाशिक मध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वतःच्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.या वेळेस जि प सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे,किरण पाटील, संपत जाधव ,दत्तू सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.दुधाला पाच रुपये अनुदान द्या..शेतकरी ऐकजुटीचा विजय असो ..राजू शेट्टी साहेब आगे बढो.या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी केंद्र शासनाने 23 जूनचा 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. 

30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो 30 रूपये देण्यात यावे.दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा.पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रूपये अनुदान जमा करावे.या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासना कडे केल्या .असे संदीप जगताप यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे.असे जि प सदस्य भास्कर भगरे सर यांनी देखील सांगितले. तसेच यावेळेस गावातील दूध संकलन केंद्राचे संचालक सुभाष मातेरे, गणेश संधान, यांचे आभार मानण्यात आले. या अभिषेकाला अनेक शेतकरी उपस्थित होते. 

दूध उत्पादकांना शासनाने 5 रुपये अनुदान द्यावे
लोकडाऊन मुळे आज अनेक दूध संघ शेतकऱ्यांना दुधाला18 ते 20 रुपये भाव देताय.त्यात उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही.त्या मुळे राज्यभरातील दूध उत्पादक त्रस्त आहे.दुधाची विक्री कमी झाली.म्हणून दूध उत्पादकांना शासनाने 5 रुपये अनुदान देऊन आधार देण्याची गरज आहे.या साठी हे आंदोलन होतंय. शासनाने लक्ष न दिल्यास लोकडाऊनचे नियम तोडून पूर्वी प्रमाणे आक्रमक पणे स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. संदीप जगताप - प्रदेशाध्यक्ष - स्वाभिमानी शेतकरी संघटना.

माय सह्याद्री टीम शंकर मरकड, अशोक वाघ  शेवगाव
थोडे नवीन जरा जुने