माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन राज्यभर सोमवारी 13 जुलैला होणार आहे.
लोकडाऊन काळातील 3 महिन्याचे घरगुती वीज बिल हे वीज कंपन्यांनी महाराष्ट्रभर वाढीव दराने ग्राहकांना दिले.कोरोनामुळे शेतकरी , कामगार , व्यावसायिक , मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यात वाढीव बिल देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळलय. या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन राज्यभर सोमवारी 13 जुलैला होणार आहे.
त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तहसील समोर दुपारी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व दिंडोरी तालुक्याचे जेष्ठ नेते माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन केले जाणार आहे.या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ बोराडे, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, युवा नेते राकेश शिंदे, जिल्हा सचिव संपत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोरोना परिस्थिती लक्षात घेता निवडकच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ही घरगुती वीज बिल माफ करावे .अशी प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे.आंदोलनाला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मास लावावा व सोशल डिस्टन्स याचे काटेकोर पालन करावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन कड यांनी दिली आहे.