घरगुती वाढीव वीज बिलांच्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र भावना.वीज बिल माफ न केल्यास जनतेत उद्रेक होईल.
नाशिक  - दिंडोरी
घरगुती वाढीव वीज बिलांच्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र भावना.वीज बिल माफ न केल्यास जनतेत उद्रेक होईल. 

लोकडाऊन काळातील 3 महिन्याचे घरगुती वीज बिल हे वीज कंपन्यांनी महाराष्ट्रभर वाढीव दराने ग्राहकांना दिले.कोरोनामुळे शेतकरी , कामगार , व्यावसायिक , मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात वाढीव बिल देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळलय . म्हणून या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तहसील कार्यालयावर  सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले.व  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
घरगुती वाढीव वीज बिलांच्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र भावना.वीज बिल माफ न केल्यास जनतेत उद्रेक होईल.

यावेळेस आज देशातली सर्वसामान्य जनता कोरोनाने पिचली आहे. राज्यामध्ये दुबार पेरणी , खत औषधांची टंचाई, भाव वाढ, बोगस बियाणं, बेरोजगारी या समस्या उभ्या ठाकल्यात .त्यात वाढीव वीज बिल देऊन ग्राहकांच्या नरड्यावर पाय देण्याचे कामच वीज कंपन्यांनी केलं.आज जनतेला आधार देण्याची गरज असताना पेट्रोल डिझेलच्या रूपानं केंद्र शासन व वीज बिलांच्या रूपाने राज्य शासन यांच्यात जनतेची लूट करण्याची टांगा शर्यत सुरू आहे की काय? असा प्रश्न पडतो.जनतेच्या या विरोधात तीव्र भावना आहे.म्हणून दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तीन महिन्याचे वीज बिल शासनाने माफ करावे.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पणे रस्त्यावर उतरले.असा इशारा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला.

गंगाधर निखाडे यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेची परिस्थिती लक्षात घेता वीज बिल माफीची मागणी योग्य आहे व आपल्या शासनाने ती मान्य करावी असे मत व्यक्त केले , प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे यांनी देखील विचार व्यक्त केले.

वेळेस या आंदोलनात ज्योतीताई देशमुख, दिलीपराव जाधव,वसंतराव थेटे,वसंतराव कावळे,गणेश हिरे,राकेश शिंदे,संपत जाधव , अभय सूर्यवंशी , सचिन कड , या विविध पक्ष , संघटना,संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दत्ता सोनवणे, किरण पाटील, नारायण संधान,शंकर फुगट, संजय आप्पा थोरात,योगेश संधान,अजय पाटील,प्रभाकर मोरे,जयराम फुगट,  आनंदा वाघ,गोरख लभडे, विश्वास संधान , वैभव जगताप,सतीश सोनवणे ,सचिन लभडे यांच्या सह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

वीज बिलांची दरवाढ मागे घ्यावी
आज महाराष्ट्रभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या बिकट परिस्थितीत कंपन्यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिल देऊन सामान्य जनतेच्या नरड्यावर पाय दिलाय. म्हणून दिल्ली सरकार प्रमाणे या तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे.व वीज बिलांची दरवाढ सुद्धा मागे घ्यावी.
संदीप जगताप -
प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ ,

Contact Us- mysahyadrilive@gmail.com 
थोडे नवीन जरा जुने