आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात वार्डावार्डामधून नागरी संपर्क अभियान सुरु केले
सोलापूर: 
दत्त नगर येथिल संयुक्त झोपडपट्टी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन . आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात वार्डावार्डामधून नागरी संपर्क अभियान सुरु केले असुन सोमवार रोजी दत्त नगर येथिल संयुक्त झोपडपट्टि येथे करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन आरोग्य शिबिरात नागरिकांची थर्मल गन द्वारे शरीरातील तापमान, व ऑक्सिमीटरच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सिजन ची तपासणी, तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली काही नागरिकांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाण्याचा सल्ला दिला. तसेच वार्ड संपर्क अभियाना अंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा काम सुरु आहे.यावेळी शहर मध्य अध्यक्ष योगेश मार्गम,नागेश म्याकल, मधुकर कुरापाटी , प्रलाद कळसकर, दिपक कुरापाटी, व्यंकटेश यंनगंदुल व इतर उपस्थितीत होते. 

माय सह्याद्री टीम

थोडे नवीन जरा जुने