प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतुन चेस्ट एक्स-रे मशीनचे लोकार्पण.
सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रूग्ण संख्या वाढती असुन मृत्युही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाच्या संशयीत रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसून येत नाहीत. तसेच कोरोनाच्या संशयीत रुग्णांचे स्वॅब टेस्टिंगचे रिपोर्ट येण्यास कमीत कमी एक दिवसाचा कालावधी लागत आहे. दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तरी अशा रुग्णांचे चेस्ट एक्स-रे मशीनव्दारे तपासणी केल्यास तात्काळ त्यांना निमोनियाचे निदान होण्यास मदत होते. जर एखाद्याचे निमोनियाचे निदान झाल्यास तात्काळ त्याची कोरोना तपासणी करण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे सदर रुग्णास तात्काळ औषधोपचार सुरु करण्यास मदत होईल.
यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वत:च्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेस दोन पोर्टेबल चेस्ट एक्स-रे मशीन उपलब्ध करून दिले आहे. सदर मशीन आरोग्य तपासणी बसमध्ये ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागामध्ये जावून तेथील नागरीकांचे छातीचा एक्स-रे काढून निमोनियाचे लवकरात लवकर निदान करणार आहेत. त्याचे लोकार्पण आज 11 जुलै 2020 रोजी दाराशा हॉस्पिटल, लष्कर येथे सोलापूर महानगरपालिका आयुक्त, पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळेस आरोग्य अधिकारी मंजुश्री कुलकर्णी, नगरसेवक भारत बडूरवाले, वैभव पाटील, दिनेश म्हेत्रे, खरटमल, अनिता घोडके व दाराशा हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
My Sahyadri Facebook Like