सोलापूर :
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठया प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 3 महिने लॉकडाऊन लागू करण्यात आली होती. सोलापूर शहरात मोठया प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. परंतू गेली 3 महिने लॉकडाऊनमुळे त्यांची रोजंदारी बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडून 4 महिन्याचे सरासरी बिल वाढीव दराने आलेले आहे. परंतू सध्या आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना विज बिल भरणे अशक्य आहे.

याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरीकांना सध्या आलेले 4 महिन्याचे विज बिल भरणे अशक्य असल्यामुळे त्यांच्या विजेच्या बिलामध्ये 50 % सवलत देण्यात यावे याबाबत मा. मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब व मा. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत साहेब यांच्याकडे मागणी चे निवेदन केले.
थोडे नवीन जरा जुने