तसेच सोयाबीन पिकांचा पेरणी उतार कमी झाला असून पिकाची पाने पिवळी
पडल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.
सदर गोष्टीची माहिती मिळताच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात शेतात जाऊन प्रत्यक्ष डाळिंब पिकांची व सोयाबीन पिकांची पाहणी आमदार अशितोष काळे यांनी केली व तालुका कृषी अधिकारी श्री. अशोक आढाव यांना फोन करून सदर गोष्टीची माहिती दिली असून पुढील कारवाई करण्याचा सूचना आमदार काळे यांनी दिल्या आहेत. तसेच कृषी सहाय्यकांकडून शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी आमदार अशितोष काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, राहुल रोहमारे, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, मधुकर औताडे, योगेश औताडे, देवेन रोहमारे, प्रवीण शिंदे, नरहरी रोहमारे, स्वप्नील रोहमारे, बाळासाहेब औताडे, गंगाधर खोमणे, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.
माय सह्याद्री टिम - अशोक वाघ , शंकर मरकड - शेवगाव अहमदनगर