Kopargaon :
कोपरगाव शहरातील उपलब्ध जागेत व्यापारी संकुलासाठी प्रस्ताव तयार करा, भाजी मार्केट मधील गाळे व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करा, कोपरगाव शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करा अशा सूचना यावेळी सदर बैठकीत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच शारदानगर परिसरात पावसाचे पाणी घुसण्याच्या समस्येवर जागतिक बँक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी सूचना दिलेल्या असून सदर कामासाठी नगरपरिषदेने पाठपुरावा करावा अशाही सूचना यावेळी दिल्या आहे.
यावेळी उपस्थित आमदार आशुतोष काळे Ashutosh Kale मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियंता दिगंम्बर वाघ, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हिरामण गंगूले, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीरमामु कुरेशी आदी उपस्थित होते.