शहरटाकळी विद्यालयात वटवृक्षाची लागवड.
कोरोना काळात शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या काळात शिक्षक शाळेत येत आहेत. या काळात शिक्षकांनी शाळा परिसरात वृक्ष संपदा वाढवून तीचे जतन होण्याकडे लक्ष द्यावे कारण भविष्यात शाळा परीसरात स्वच्छ पर्यावरण राहण्यासाठी आज वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लाडजळगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी केले. पदाधिकारी गु्प व साई फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत वड वृक्ष लागवड संकल्पनेतून शनिवार रोजी आंत्रे येथील शहरटाकळी विद्यालयात सदस्या सौ काकडे यांच्या हस्ते १० वटवृक्षाची लागवड करण्यात आली
यावेळी प्रगत शेतकरी आबासाहेब राऊत, प्राचार्य बाळासाहेब भगत, ज्ञानदेव खराडे, शिवाजीराव शेळके, शिवाजीराव खराडे, प्राध्यापक श्रीराम मरकड, भुसे गुरूजी, बाळासाहेब ठोंबळ, पोस्टमास्तर शिवाजी गिरम , मनोज घोगडे , डॉ.अनिल चिकणे , अजय नजन , पर्यवेक्षक परशुराम नेहुल , पत्रकार शंकर मरकड, शिक्षिका सुरेखा शेलार , मोहिनी बडधे , अलका भिसे ,रेखा आढाव , शिक्षक सहदेव साळवे, शितल गोरे, संजय मरकड, दिपक बोडखे, संजय दुधाडे, रविंद्र मडके, बबन फरताळे ,गोरक्षनाथ सातपुते ,शशिकांत काकडे ,बाळकृष्ण ठोंबळ ,गणेश लबडे ,हर्षद कचरे ,शशिकांत सुर्यवशी ,नितिनकुमार फोपसे ,अमोल कमानदार ,आदिनाथ काटे, ईश्वर वाबळे ,दत्तात्रय देहडराय , राजु हुशार पांडुरंग वीर , अजित मुळे, आदी उपस्थित होते.
यावेळी कोरोना व आपण ,पुढील काळात घ्यावयाची काळजी , सोशल डिंस्टींग, या विषयावर प्राचार्य बाळासाहेब भगत यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन संजय दुधाडे यांनी केले तर आभार पत्रकार शंकर मरकड यांनी व्यक्त केले .
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.