अहमदनगर - शेवगाव
शेवगाव तालुक्यातील बहुतांश भागात जवळपास सर्वत्रच गेल्या चार दिवसापासून चांगला पाऊस पडला असून चहूकडे रानगवत वाढले आहे तर अनेक गावात ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांनी डासांचे प्रमाण वाढले असून डासांच्या पैदाशीला याने बढावा मिळणार आहे. त्याने साथरोग वाढु शकते यासाठी सर्व ग्रामपंचायतने साथरोग नियंत्रण उपाययोजना कराव्यात.
असे आवाहन सभापती डॉ . क्षितिज घुले यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना केले आहे. यात ग्रामपंचायत ने गावात धूरफवारणीला प्राधान्य द्यावे. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधूनही होते आहे. कारण सध्या सर्वच नागरिक कोरोनाशी लढा देत असतानाच पावसाळा देखील सुरू आहे ,तरी दर वर्षी डेंग्यू,मलेरिया ,चिकुनगुण्या या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूरफवारणी ग्रामपंचायत वतीने करण्यात येते मात्र उशीरा केलेल्या फवारणी ने उपयोग होत नाही कारण तोपर्यंत रोगाने आपले हात पाय पसरवलेले असतात व साथीचा डास चावल्याने नागरीकांना आजारी पडून दवाखान्यात जावे लागते त्यात कोरोणा या साथीची भीती असल्याने आपण या वर्षी डेंग्यू, मलेरिया,चिकुुनगुनिया यासारख्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंंदा तीन ते चार वेळा धूरफवारणी करून गावातील साथीची परीस्थिती नियंत्रणात ठेवावी .
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.