अहमदनगर पाथर्डी :
पाथर्डी तालुक्यातील मोहटा परीसरातील मानेवाडी गावात रानडुक्करांनी मोठा हैदोस घातला असून खरीप शेती पिकाचे मोठे नुकसान रानडुक्कराकडुन होत आहे. बाजरी, भुईमुग, मका आदी पिकाचे डांभेची डांभे रानडुक्कराकडुन फस्त केली जात आहे. डुकरे मोठ्या संख्येने पिकातून जात असताना पिके भुईसपाट होऊन वाया जात आहे. पोट-यात आलेली बाजरी, कोवळ्या पानांचा भुईमुग, ऊस डुकरे खात असताना मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी होत आहे.
काही ठिकाणी शेतकरी सापळे लावून बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करतात मात्र रानडुक्करे त्याला दाद देत नसून रानडुक्कराचा वावर या परिसरात वाढतच चालला असून शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरिकांकडून होते आहे.
पिकाच्या संरक्षणासाठी रात्र जागून काढावी लागते.
शेजारी असलेल्या ओढ्यात ही डुकरे दडत असुन
आमची जमिन गावच्या ओढ्याच्या शेजारीच आहे बाजरी, मका , भुईमूग ,ऊस ही पिके रानडुक्करांची लक्ष ठरत असुन मोठा त्रास सहन करून पिकाच्या संरक्षणासाठी आम्हाला रात्र रात्र जागून काढावी लागते आहे मात्र तरीही डुकरांकडुन पिकाचे नुकसान होत आहे.
सोमनाथ पोफळे - शेतकरी, मानेवाडी.
माय सह्याद्री टीम -शंकर मरकड , अशोक वाघ शेवगाव