अहमदनगर - शेवगाव
आज रिपोर्ट ची प्रतिक्षा, दहिगावनेत चिंता
शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे मालेगाव येथुन परतलेल्या वृध्दाचा मृत्यु झाल्याने संपर्कातील १३ नागरीकांना नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे कोविड तपासणी साठी पाठवण्यात आले होते. त्यांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे मात्र शनिवार रात्री श्वसनाचा त्रास होऊ लागलेल्या दहिगावने येथील विलिगीकरणात असलेल्या  ५० वर्ष वयोमान असलेल्या व्यक्तीस कोरोना लक्षणे दिसून आल्याने  संशयित म्हणून नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पुढील तपासणीस पा़ठवले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली . 

१४ जुलै रोजी  मृत्यु पावलेल्या वृध्दाच्या संपर्कातील १३ नागरीकांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट तब्बल पाच दिवसाने प्राप्त झाले आहे. या पाच दिवसापासून दहिगावने गाव व परिसरातील गावात तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यांचे रिपोर्ट आले  त्या वेळी नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र अवघ्या काही तासात त्रास होऊ लागल्याने मुंबई ( उल्हासनगर ) येथुन दहिगावने येथे १४ जुलै पासून कुटुंबातील सदस्या बरोबर विलिगीकरणात असलेल्या व्यक्तीस  रविवारी रोजी सकाळी कोरोना टेस्ट साठी पाठवण्यात आले आहे. नागरिकांना काल पाठवलेल्या नागरिकाच्या रिपोर्ट ची आज प्रतिक्षा आहे
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने