जोरदार वा-याच्या झोताने चप्पु पलटी होऊन जाळ्यात गुंतल्याने ओढावला मृत्यू.
अहमदनगर - शेवगाव
मंगळवार ७ रोजी दुपारी ४ च्या सुमारास झालेल्या वादळाने ढोरसडे शिवारातील जायकवाडी जलाशयात मच्छीमार चप्पु पलटी झाल्याने पाण्यात पडुन गायब झाला होता शोधाशोध करूनही सायंकाळ पर्यंत या मच्छीमाराचा तपास लागला नव्हता. आज सकाळी ८ वाजता शोध सुरू असताना जाळ्यात गुंतलेला सुंदरहरी पवार यांचा मृतदेह सापडला. सुंदरहरी पवार ( रा.ढोरसडे ) मंगळवार रोजी मासे धरण्यासाठी दुपारी धरणावर गेले होते. ४ च्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यासह आलेल्या जोरदार पावसाने चप्पु वरून तोल जाऊन सुंदरहरी पाण्यात पडले. पाण्याबाहेर असलेल्या इतर नागरीकांनी पवार यांना पाण्यात पडताना पाहिले मात्र जोरदार पाऊस व वारे वाहत असल्याने त्यांना ताबडतोब पाण्यात जाता आले नसल्याने सुंदरहरी पवार यांना वेळेत मदत मिळू शकली
नव्हती.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड ,अशोक वाघ शेवगाव.
My Sahyadri Facebook Page लाईक करा