अहमदनगर शेवगाव:
राज्यमंत्री बच्चू कडू यांना वाढदिवसाची अनोखी भेट.
अहमदनगर प्रहार संघटनेच्यावतीने असलम पठाण या अंध असलेल्या आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीला नवीन घर बांधून दिले असून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हीच मला वाढदिवसाची अनोखी भेट आहे. अशा भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार मंजिल या घराच्या अनावरण प्रसंगी दुरध्वनी वरून व्यक्त केली.
अहमदनगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या अंध असलम पठाण यांना संघटनेच्या माध्यमातून नविन घर बांधून दिले आहे त्याचे अनावरण अहमदनगर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रहार मंजिल या घराच्या अनावरण प्रसंगी अजय महाराज बारस्कर (प्रवक्ते महाराष्ट्र राज्य),प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार , जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी ,जिल्हा कार्यध्यक्ष अजित धस, डॉ. दादा साहेब काकडे ,ॲड लक्ष्मणराव पोकळे ,अपंग महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष पप्पू येवले, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, विद्यार्थी अध्यक्ष योगेश्वर घागरे, शेवगाव तालुकाध्यक्ष संदिप बामदळे, आनंद दातरांगे, शिरसाठ मेजर , नंदू वारुळे , विलास कोरडे आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य मंत्री बच्चु कडू यांनी संभाषण करताना सांगितले की अशा कार्यक्रमाला मी जातीने उपस्थित राहत असतो परंतु कोरोना रोगामुळे मला प्रत्यक्ष उपस्थिती शक्य नाही परंतु जिथे जिथे परोपकार आणि अपंगांचे अश्रू पुसण्याचे काम केले जाते त्या ठिकाणी मी अंतकरणापासून हजर असतो असे सांगितले.
नगर पदाधिकारी यांचे कौतुक
प्रहार संघटना तुकाराम महाराजांच्या जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या वचनाप्रमाणे काम करणारी संघटना आहे. जात ,पात ,धर्म ,पंथ न पाहता मानवता हाच दृष्टिकोन ठेवून असलम पठाण या अपंगांच्या अंतकरणात पांडुरंग समजून काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे असलम पठाण यांना नवीन घर हीच आमची पंढरपूरची वारी झाली आहे.
अहमदनगर प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष करून बारस्कर महाराज ,संतोष पवार ,विनोद सिंग परदेशी, लक्ष्मणराव पोकळे , अजित धस ,प्रकाश बेरड यांचे मी मनापासून आभार मानतो .
राज्यमंत्री बच्चू कडू
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
संपर्क mysahyadrilive@gmail.com