अहमदनगर शेवगाव: 
दुसऱ्या दिवशी शेळ्या व कुत्र्याची केली बिबट्याने शिकार , वाघोलीत बिबट्या ची दहशत. 
शेवगाव तालुक्यातील वाघोलीत बिबट्याने पवार शेळके वस्ती परीसरातील संतोष केसभट यांच्या घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या  शंभू संतोष केसभट या तीन वर्षांच्या मुलावर हल्ला करून जखमी केले आहे. शनिवार रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारात शेजारी असलेल्या मोठ्या बहिणीने संतोष ला ज्या वेळी बिबट्या ने जबड्यात धरून ओढले त्याच क्षणी शंभू च्या बहिणीणे शंभू चा एक पाय ओढून धरला या झटापटीत पत्र्याच्या पडवीला धक्का लागून आवाज झाल्याने संतोष केसभट हे लगबग बाहेर येऊन बिबट्या ला हाकलले शंभू ला मुलीने क्षरशा बिबट्याच्या दाढेतुन ओढून काढले. या दरम्यान बिबट्याच्या हल्यात मुलाचा एक कान तुटला असुन डोक्यावर बिबट्याचा दात घुसल्याने मुलाला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर आज रविवार रोजी मुलाचे ऑपरेशन करण्यात आले असून सायंकाळी मुलगा शुध्दीवर आला आहे. तर रविवार दुपारी या बिबट्याने याच परीसरात दातीर वस्तीवर मेंढपाळच्या शेळ्या वर हल्ला करून आपले शिकार बनवले आहे.

एक किलोमीटरच्या अंतरावर दुसरा हल्ला करून बिबट्या ने मेंढपाळ नारायण दातीर व सहकारी घोंगडे यांच्या कळपावर दातीर वस्ती शेजारी बिबट्याने हल्ला करून एका शेळीला आपले शिकार बनवले आहे.  मेंढपाळ यांनी लावलेल्या जातीमुळे बिबट्या ला शेळी ओढून नेता आली नाही परंतु बाहेर असलेल्या  पाळीव कुत्र्यावर बिबट्या ने  हल्ला करून फरपट नेले. बिबट्या च्या वावराने व दोन ठिकाणी झालेल्या हल्यात बिबट्या ने वाघोली परीसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. दरम्यान रविवारी वनविभागाने परीसरात पिंजरा लावला आहे.
थोडे नवीन जरा जुने