अहमदनगर शेवगाव:
शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून   कोवीड योद्धांचा सन्मान करण्यात आला, कृषी उत्पन्न बाजार समिती  सभागृहामध्ये  सोशल डिस्टंसिंग चे पालन करून झालेल्या कार्यक्रमात  हा सन्मान सोहळा पार पडला. 

लॉकडाऊन काळात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून कोरोना महामारी च्या विरोधात समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या योद्ध्यां म्हणून प्रकाश लड्डा माहेश्वरी सभा,डाॅ. विकास बेडके अध्यक्ष मेडिकल असोसिएशन शेवगाव, डाॅ. मनोज पाचरणे, शेख सादिक फारुख, इरफान पठाण, खान रियाज अजमल, शेवगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष वजीर  पठाण, शेवगाव नगर परिषदेचे कक्षाधिकारी राजू इंगळे, रमेश खरात, स्वच्छता विभागाचे भारत चव्हाण, युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, प्रा. आरे सर, सामाजिक कार्यकर्ते सुनील काकडे , बाळासाहेब देशपांडे आदी मान्यवरांचा शाल,श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला,

या कार्यक्रमाला   राजाभाऊ झरेकर, बाळासाहेब काशीद, मानधना शेठ, नितीन मलानी , दगडूशेठ बलदवा, भगवान  धूत, रमण बिहाणी, मयूर कलंत्री, दिलीप मुंदडा, श्रीकांत लड्डा तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगडे, प्रवीण म्हस्के, अमोल देवढे, मेजर अशोक भोसले, प्रशांत घुमरे, नानासाहेब कंठाळे आदी मान्यवर  उपस्थित होते,

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड  / अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने